सातार्डा / प्रतिनिधी
सातार्डा – भटवाडी येथील तरुण राजेश रवींद्र भगत ( 28 ) याने सोमवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान रहात्या घराच्या खोलीत कंबरबेल्टच्या सहाय्याने गळफास घेऊन तडकाफडकी आत्महत्या केली.राजेश भगत या तरुणाने आत्महत्या केल्याने गावातून हळहळ व्येक्त केली जात आहे.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.राजेश भगत हा तरुण पर्वरी – गोवा येथील मॉलमध्ये वाहतूक व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. काळोबा स्पोर्ट क्लबचा तो अष्टपैलू, दर्जेदार क्रिकेटपटू होता. रवळनाथ क्रिकेट क्लब, आर टी एम स्पोर्ट क्लब, रायाचेपेड , महापुरुष स्पोर्ट क्लब, तरचावाडा या क्रिकेट क्लबसाठी राजेश भगत भरीव योगदान दिले होते. भटवाडीतील विविध सामाजिक कामांमध्ये त्याचा सहभाग होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. पच्छात आई, बहीण असा परिवार आहे.