Committed to saving the lives of Thalassemia children
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांची ग्वाही
ज्या कुटुंबात थॅलिसेमियाग्रस्त बाळ जन्माला आलेले आहे, त्या कुटुंबाचे दुःख न संपणारे आहे. जिल्ह्यातील १४ थॅलिसेमियाग्रस्त मुलांचे रक्ताच्या पूर्ततेचे पालकत्व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने कायमस्वरुपी घेतले असुन थॅलिसेमियाग्रस्त मुलांच्या जीवनरक्षणासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याची ग्वाही सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यानी दिली.
तळवडे येथील श्रीम्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्द्घाटन प्रसंगी प्रकाश तेंडोलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डाॅ डी. पी. गावडे, श्रीम्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळाचे सल्लागार प्रसाद गावडे, अध्यक्ष प्रविण लोके, उपाध्यक्ष शैलेश हरमलकर, सचिव सुशांत गावडे, खजिनदार भरत गावडे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ चव्हाण, सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे शशांक विचारे, कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक धनंजय साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी