वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात अध्यक्ष मुर्मू यांच्यावर जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर समुदायांमधील शत्रुत्व वाढवण्याचा आणि प्रक्षोभक व भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रपती दलित असल्यामुळे त्यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी बोलावले नाही, असे वक्तव्य केजरीवाल आणि खर्गे यांनी केले होते. जातीवाचक भाष्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार झाली आहे.