कोल्हापूर प्रतिनिधी
सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे अशी तक्रार आणखी 25 शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे दाखल केली आहे. याआधी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात याच प्रकारची तक्रार कागलचे दाखल झाली होती.
आपल्या तक्रारीत शेतकऱ्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, “मुश्रीफ यांनी उभारलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी या कारखान्याचे सभासद होण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये गोळा केले. अलिकडेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील लोकांचा व काही एलएलपी कंपनीच्या मालकीचा असल्याचे कळाले आहे. या कारखान्यामध्ये अन्य कोणीलीही सभासद करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांच्याकडून केवळ पैसे जमा करून घेतले आहेत.” असे तक्रारीत म्हटले आहे.
याआधीही मुरगुड पोलिसांमध्ये आमदार हसन मुश्रिफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कराखान्यामध्ये सभासद करून घेतो असे सांगून दहा हजार रुपये घेऊनही शेअर्स दिलेले नाहीत तसेच सभासदही केले नाही. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन शिवाजी जाधव, प्रकाश डावरे गलगले यांच्यासह पंचवीस शेतकऱ्यांच्या वतीने डीवायएसपी श्रीकांत पिंगळे यांना देण्यात आले आहे.