ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचे आमदारही फुटणार असल्याचा दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला.
पाटील म्हणाले, विखे पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल, असे मी नगरच्या सभेत सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते भाजपकडून निवडणूक लढले. त्यानंतर मी दोन महिन्यापासून सांगत होतो की, अजित पवार आपल्यासोबत सत्तेत येतील ते आले. आता काँग्रेसही फुटीच्या मार्गावर आहे. त्यांचे आमदार तयार आहेत. मात्र, ते कुणाकडे येतील हे सांगता येणार नाही.
यासंदर्भात तुमची कोणत्या काँग्रेस आमदारासोबत चर्चा झालीय का, असे विचारले असता ते म्हणाले, माझी कोणत्याही आमदारासोबत चर्चा झाली नाही. पण काँगसचे आमदार फुटणार असल्याचे मी निश्चितपणाने ऐकले आहे, असे त्यांनी सांगितले.