कुडाळ / प्रतिनिधी
एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाट संचलित एस् .एल्. देसाई विद्यालय आणि कै. सौ.एस् .आर् .पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयात दिनांक ४ व ५ सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलने १४ वर्षांखालील मुले, १४ वर्षांखालील मुली ,व १७ वर्षांखालील मुले या तिन्ही गटात विजय प्राप्त करून दरवर्षीप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी वकील अँडव्होकेट . रुपेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी संस्था कार्याध्यक्ष श्री. रेडकर गुरुजी, संस्था कार्यकारिणी सदस्य श्री. देवदत्त साळगावकर ,श्री .राजेश सामंत, श्री .दीपक पाटकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .कोरे सर ,नेरूर माड्याचीवाडी हायस्कूल मुख्याध्यापक श्री .रावण सर ,तालुका क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री. अतुल सावडावकर ,शारीरिक शिक्षण महासंघ अध्यक्ष श्री. अजय शिंदे, शिक्षक प्रतिनिधी श्री.संदिप साळसकर सर तसेच जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
१४ वर्षे वयोगट- मुली वेदिका गोसावी, वैभवी केळुसकर, श्रेया सागवेकर, गायत्री चिपकर ,चिन्मयी सक्रे, धनदा सावंत, तन्वी दाभोलकर.१४ वर्ष वयोगट- मुलगे मांगल्य मेतर, सुयश साटेलकर ,मिहिर मेस्त्री ,सुयश पाटकर, श्रेयस घाडी,बाळकृष्ण रावले . १७ वर्षे वयोगट- मुलगे शिवराम नांदोसकर ,आकाश गोसावी, गौरांग गोसावी, चंद्रकांत तुळसकर, भावेश म्हापणकर, सहदेव परब या सर्व वयोगटातील मुलांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करून रसिकांची वाहवा मिळविली .या सर्व वयोगटातील विजयी संघाची निवड दिनांक १४, १५, १६ सप्टेंबर या कालावधीत एस.एल. देसाई विद्यालय पाट मध्ये होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे पाट हायस्कूलची उज्ज्वल परंपरा या सर्व मुलांनी कायम राखली आहे. १७ वर्षांखालील मुली प्रज्ञा गावडे, नताशा निवतकर, सिया मयेकर, अनुष्का रावले, जानह्वी रावले, मनस्वी मेतर या विद्यार्थिनींनीही चांगला खेळ करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेदरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती.विद्या शिरस मॅडम, संस्था उपाध्यक्ष श्री. दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष श्री. समाधान परब ,जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन सचिव श्री. निलेश चमणकर, संस्था कार्यकारणी सदस्य श्री. सुभाष चौधरी ,श्री.अवधूत रेगे,श्री. बाबा तळावडेकर, श्री. पंढरीनाथ चव्हाण लिपिक यांनी भेटी दिल्या. यावेळी आजी माजी खेळाडू ,क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री .रुपेश कोनकर, श्री.चारूहास वेंगुर्लेकर, श्री. भावेश मेतर,श्री.पंकज राणे, श्री. कुबल सर ,श्री इर्शाद शेख ,श्री. नेविल गोन्सालवीस ,श्री .अमित हर्डीकर, श्री. हेमंत गावडे यांनी काम पाहिले.
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले .या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटातील प्रत्येक तालुक्यातील विजयी ८ संघ सहभागी झाले होते .स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक व क्रीडाशिक्षक श्री. राजन हंजनकर सर ,क्रीडा शिक्षक श्री.संजय पवार सर ,श्री .कुबल सर, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,यांनी अथक प्रयत्न केले. संस्था पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेमुळेच विद्यालयाने असे घवघवीत यश संपादन केले.