सर्वसाधारणपणे लोक एखाद्या नागरी वस्तीत घर किंवा मालमत्ता विकत घेणे पसंत करतात. परंतु एका व्यक्तीच्या याच्याउलट कृती केली आहे. त्याने निर्जन वाळवंटात स्वत:साठी एक गुहा खरेदी करत त्यात स्वत:च्या मनानुसार बदल केले आहेत. या गुहेमुळेच हा व्यक्ती आता कोट्याधीश झाला आहे. त्याने स्वत:च्या क्रिएटिव्हिटीद्वारे या गुहेला लक्झरी घरात रुपांतरित केले आहे.
आता देशविदेशातून लोक या ‘केव्ह हॉटेल’मध्ये राहण्यासाठी येत असून मोठा खर्च करत आहेत. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका व्यक्तीने वाळवंटात लक्झरी केव्ह हॉटेल निर्माण केले आहे. हे हॉटेल गुहेत असून टिकटॉकवर या हॉटेलची छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत.
वाळवंटात मी एक गुहा खरेदी केली होती. या गुहेत स्वत:ची क्रिएटिव्हीटी पणाला लावत याला लक्झरी केव्ह हॉटेलमध्ये बदलले आहे. आता या हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यासाठी मोठ्या संख्येत लोक येत आहेत. पर्यटकांमुळे आता मोठी कमाई होत आहे. हॉटेल कधीच रिकामी नसते असे संबंधित मालकाने सांगितले आहे.
गुहेतील दगड कापून त्याला खोलीचे रुप देण्यात आले आहे. आत बेडरुम, बाथरुम, फर्निचर, लायटिंग इत्यादींची व्यवस्था आहे. तर गुहेबाहेरील दृश्य अत्यंत मोहक आहे. हे हॉटेल एखाद्या फाइव्ह स्टारप्रमाणे दिसून येत आहे. आता अनेक जण वाळवंटात मालमत्ता खरेदी करण्याचा विचार या हॉटेलमुळे करत आहेत. केव्ह हॉटेलच्या व्हिडिओला आतापर्यंत 20 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.