Adipurush Reaction : बहुचर्चित आदिपुरुष सिनेमा शक्रवारी रिलीज झाला. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याच्यावर टिका सुरु झालीय. मात्र पहिल्याच दिवशी या सिनेमाने 140 कोटीची कमाई केली आहे. ग्लोबल बॉक्सवर आदिपुरुषने विक्रमी कमाई केली आहे. ग्लोबल बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. मात्र यातील पात्रे आणि संवादावरुन हा चित्रपट ट्रोल होत आहे. हनुमंताच्या तोंडी असलेले विषय तर चेष्टेचे विषय बनले आहेत. तर सिनेमातील संवाद अत्यंत पोरकट असल्याची टीका होतेयं. काही समीक्षकांनीही यावर टीका केलीयं. हिंदूंचा अपमान केल्याची टीका प्रेक्षकांनी केली आहे.
अभिनेता सैफ अली खान याने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला त्यावेळी सैफ अली खान एका वटवाघुळावरुन येताना दाखवला गेला. यानंतरच ट्रोलिंगला सुरुवात झाली. या चित्रपटासाठी जवळपास 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र यातील पात्रे, संवादफेक, भाषाशैली यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला नाही. लहानपणापासून राम,सीता, रावण आणि हनुमान यांची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात वेगळीच आहे. त्यातच या चित्रपटात केलेला अॅनिमेशनचा अतिरेक यामुळे चित्रपटापेक्षा रामायणाचे कार्टुन चांगलं असल्याचे अनेकांनी म्हटलयं. निर्माते, दिग्दर्शक आणि संहितालेखक या चित्रपटात फेल झाल्याचे प्रेक्षकांनी म्हटलयं.
दुसरीकडे सुप्रसिध्द रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते अरुण गोविल यांनी आदिपुरुष चित्रपटाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. रामायण आमची आस्था आहे. या चित्रपटामुळे मन दु:खी झाले. भगवान राम आदी आणि अंत आहे. त्यांच जे स्वरुप आहे ते दाखवण गरजेचं आहे.त्यात टेक्निकलचा वापर करुन चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आलं आहे. याची काहीचं गरज नसल्याचे त्यांनी म्हटलयं.