प्रतिनिधी /पेडणे
आज मंगळवार दि. 14 जून रोजी होणाऱया वटपौर्णिमा व्रतासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी पेडणे बाजारात सुवासिनी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
व्रतात वडाला गुंडाळण्यासाठी लागणारी सूतगुंडी, काळे मणी, वडाची पाने, अननस, आंबे, फ्ढणस, पेरू, केळी व इतर फ्ढळे सुवासिनी महिला खरेदी करत असल्याचे दिसून आले.
भारतीय संस्कृती नुसार दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी महिला वटपौर्णिमेचे व्रत साजरे करतात. आपल्या आजूबाजूच्या परिसरात वडाचे झाड असलेल्या ठिकाणी जाऊन किंवा ते जर शक्य नसेल तर घरात वडाची फांदी आणून त्या ठिकाणी वडाची पूजा केली जाते. आणि हाच पती आपल्याला एकच नव्हे तर सात जन्मी मिळावा म्हणून ती देवाकडे मागणे करत असतात.
वटपौर्णिमा साजरी करण्यामागे निसर्गाची पूजा करणे हा यामागचा उद्देश आहे. वटपौर्णिमा साजरी करत असताना केवळ वडाची पूजा करावी. कारण वट हजारो वर्षे टिकत असतो. तो आपल्याला सावली देतो शिवाय शुद्ध हवा ऑक्सजिन देत असतो. त्यामुळे या वटवृक्षाचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली. आणि त्याच प्रथेनुसार हे व्रत साजरे केले जात आहे.