सावंतवाडी / प्रतिनिधी
जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान सावंतवाडी येथे रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी सायकांळी ६ वाजता शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब , तसेच सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.