नवी दिल्ली : रिटेल चेन डी-मार्टच्या मालकीच्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत स्वतंत्रपणे 10,384.66 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून ते 35.75 टक्के अधिक आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी याच तिमाहीत उत्पन्न 7,649.64 कोटी रुपयांचे होते.
30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत उत्पन्न स्वतंत्र आधारावर 10,384.66 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. डी-मार्ट सप्टेंबर अखेरपर्यंत देशभरात 302 स्टोअर्स चालवत होते. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा निव्वळ महसूल 5,218.15 कोटी रुपये होता. 2019-20 मध्ये साथीच्या रोगापूर्वी जुलै-सप्टेंबर तिमाहीत ते 5,949 कोटी रुपये होते.