प्रतिनिधी/ बेळगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार दि. 27 रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. यावेळी त्यांचा रोड शो होणार असून, सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक विद्युतवाहिन्या हटविण्यात आल्या. कॉलेज रोड, रामलिंगखिंड गल्ली या परिसरात शनिवारी धोकादायक विद्युतवाहिन्यांचा सर्व्हे करून त्या हटविण्यात आल्या.
पंतप्रधानांचा बेळगाव शहरातील प्रमुख भागातून रोड शो होणार आहे. या रोड शो दरम्यान कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. शनिवारी महानगरपालिका, पोलीस व हेस्कॉम यांच्या संयुक्त पथकाने रोड शोच्या मार्गावर सर्व्हे करून धोकादायक ठिकाणच्या विद्युतवाहिन्यांची उंची वाढविली तर काही ठिकाणी विद्युतवाहिन्या काढण्यात आल्या आहेत.