सकाळी साडे आठनंतर गाभाऱ्या स्वच्छतेला प्रारंभ : देवीच्या मूर्तीवर इरलं पाघणार; महासरस्वती चौकात असणार देवीची उत्सवमूर्ती, सायंकाळनंतरच घडणार अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर प्रतिनिधी
येत्या 26 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या शारदिय नवरात्रौत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून बुधवार 21 रोजी करवीर निवासिनी अंबाबाईचा गाभारा स्वच्छता केला जाणार आहे. मुंबईतील आय-स्मार्ट पॅसिटेक प्रायव्हेट लिमिडेट कंपनीचे आठ ते दहा कर्मचारी गाभाऱयाची स्वच्छता करण्यात आले. सकाळी साडे आठच्या सुमारास अंबाबाईच्या मूर्तीवर इरलं पांघरून मंदिरातील पितळी उबरठय़ाजवळील दरवाजा बंद केला जाणार आहे. गाभाऱयांची पूर्ण स्वच्छता झाल्यानंतर हा दरवाजा खुला होईल. त्यामुळे 9 तास अंबाबाईचे दर्शन भाविकांना मिळणार नाही. दरम्यानच्या काळात मंदिरातील महासरस्वतीदेवीच्या चौकात दर्शनासाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान केली जाईल.
कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना अग्निशमनची प्रात्याक्षिके…
दरम्यान, अंबाबाईच्या उत्सवाच्या आग, चेंगरा-चेंगरीसारखा प्रकार घडल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याची अंबाबाई मंदिरात तैनात राहणाऱया कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना प्रात्याक्षिकांसह माहिती देवस्थान समिती व महापालिकेच्या अग्निशमन दलाचे वतीने देण्यात आली. प्रारंभी फायर ऑफिसर दत्तगीर मुल्ला यांनी मंदिरातील आग विझवणाऱया अग्निशमन उपकरणांची पाहणी केली. यानंतर मंदिरात अचानक आग लागल्यास अथवा पावसात शॉर्टसर्किट झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन उपकरण कसे हताळाचे याची माहिती कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना सांगितली. शॉर्टसर्किटचा प्रकार उद्भवल्यास तातडीने वीज पुरवठा करणाऱया यंत्रणेचा मेन स्वीच बंद करायला उशिर करु नका, असाही निर्वाणीचा सल्ला दिला. अवई उटून मंदिर अथवा आवारात चेंगरा-चेंगरीचा प्रकार घडल्यास भाविकांना धीर कसा द्यायचा, एखादा भाविक अत्यवस्थ झाल्यास, पडून जखमी झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करायचे, रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी काय करावे, याचीही माहिती सांगितली. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
गरुड मंडपाला वॉर्म व्हाईट लाईट…
अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपातील अंतरंगात अत्याधुनिक बनावटीची वॉर्म व्हाईट कलर टय़ूब लाईट बसवण्यात आली आहे. या लाईटने गरुड मंडपाला परातन वास्तूसारखा येणार आहे. मंदिरातील तीन हायमास्ट लॅम्पची पाहणी केली. तसेच भरपावसातही हायमास्ट बंद पडू नये, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे देवस्थान समितीचे वायरमन राम वांद्रे व प्रशांत आंबेकर यांनी सांगितले.
कोल्हापूर ते औरंगाबाद दुर्गाज्योत दौड…
भिलदरी (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील जय मातादी मित्र मंडळाचे 25 कार्यकर्ते मंगळवारी सायंकाळी 5 वाजता दुर्गाज्योत प्रज्वलनासाठी अंबाबाई मंदिरात आले होते. त्यांनी सामान्य भाविकांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करुन अंबा माता की जय अशी घोषणा देत मंदिराला प्रदक्षिणा घातली. यानंतर मंदिराच्या घाटी दरवाजातून बाहेर भाऊसिंगजी रोड मार्गे औरंगाबादच्या दिशेने दौड करायला सुरुवात केली. ही तब्बल 600 किलो मीटरची असणार आहे.
देवस्थान समितीचे आवाहन…
अंबाबाई मंदिरात प्लास्टिकला बंदी.
मोठय़ा वस्तू अथवा पिशव्या मंदिराच्या द्वारावर रोखणार.
मंदिराच्या चारही दरवाजांवर हॅण्ड मेटल डिटेक्टरने तपासणी करुन मंदिरात भाविकांना प्रवेश देणार.
मंदिराच्या ओवऱयांमधील दुकानदारांनी अग्निशमन उपकरणे ठेवणे अत्यावश्यक.
चार ठिकाणी आरोग्य केंद्र
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षाच्या नवरात्री उत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनास कमी प्रमाणात भाविक आले होते. यंदाचा उत्सव मात्र पूर्णपणे निर्बंधमुक्त होणार असल्याने भाविकांची गर्दी जास्ती प्रमाणात होणार हे गृहित धरुन देवस्थान समितीने नियोजन केले आहे. या नियोजनाचाच एक भाग म्हणून मंदिराच्या चारही दरवाजांवर प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
अंबाबाईच्या पूजांपासून ते पालखी सोहळ्यापर्यंतच्या लाईव्ह दर्शनासाठी खालील ठिकाणी एलईडी क्रीन उभारणार खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, छत्रती शिवाजी महाराज चौक, अंबाबाई दर्शन रांग, शाहू खासबाग मैदान-खाऊ गल्ली, बागल चौक
दिव्यांगासाठी व्हीलचेअर…
अंबाबाई मंदिर परिसरात दिव्यांगांना इतर भाविकांप्रमाणे वावरता यावे, यासाठी देवस्थान समितीने व्हिलचेअरची सोय केली आहे. या व्हिलचेअरवर बसून दिव्यांगांना मंदिराची प्रदक्षिणाही घालता येणार आहे.