Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याकांडामध्ये थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे.आरोपी राहुल हंडोरेने दर्शनाच्या गळ्याभोवती आधी कंपासमधील कटरने वार केले. नंतर तिच्या डोक्यात दगड घालून हत्य़ा केल्याची माहिती समोर आली आहे. हंडोरे याने पोलीस जबाबात याची माहिती दिली.
हत्येचा हेतू नव्हता, रागाच्या भरात घडलं असल्याचा दावा राहुलनं केला आहे. यावेळी जबाबात म्हटलयं की, कंपासमधील कटरनं गळ्यावर तीन ते चार वार केलं. तिचा रक्तप्रवाह सुरु होताच त्यानंतर डोक्यात दगड घातला.यात दर्शनाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
मात्र हा खून हंडोरेने ठरवून केला का असा प्रस्न उपस्थित होत आहे.
नेमकं काय घडलं
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे 12 जूनला राजगड्याच्या पायथ्याशी पोहचले.त्यानंतर त्य़ांनी ट्रेक सुरु केला. मात्र ट्रेकच्या पहिल्याच टप्प्यावरती त्यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद लग्नावरुन होता. दर्शनाच्या घरचे तिचे लग्न दुसऱ्याच मुलासोबत करणार होते. त्याला राहुल हंडोरे याने आक्षेप घेतला होता.तिचे लग्ने आपल्याशीच व्हावे यासाठी दर्शनाकडे त्याने तगादा लावला होता. दर्शनाने नकार देताच राजगडाच्या पायथ्याशी तिच्यासोबत वाद सुरु केला. या वादातून त्याने हत्या केली.