Daughter of Dodamarg II from Char State
शिवसंस्कार वेशभुषा स्पर्धेत निधी नाईकचे यश
चार राज्यातुन सहभागी झालेल्या स्पर्धकांतुन दोडामार्ग सावंतवाडा येथील निधी सागर नाईक हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. शिवसंस्कार वेशभुषा स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.संपूर्ण महाराष्ट्र तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात येथून शिवसंस्कार वेशभुषा स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे आयोजन मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी आणि शिवसंस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. निधीने छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा करीत वक्तृत्व सादर केले होते. तिला वडील सागर नाईक, आई सेजल नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले. निधीच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दोडामार्ग – प्रतिनिधी