सावंतवाडी / प्रतिनिधी
Death of Gunaji Sawant
तळवडे खेरवाडी येथील जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक गुणाजी सिताराम सावंत वय 86 यांचे पुणे येथील आर्मी हॉस्पिटल मध्ये मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शिक्षकी पेशाबरोबर शासनाची पोस्टाची अल्पबचत योजना, 100% साक्षरता अभियान ,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं तसेच मुलांच्या सर्वांगण विकासासाठी भरपूर उपक्रम राबविले,. कुठल्याही विषयावर बोलण्यात ते तरबेज होते त्यावेळी शाळांच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी लोकवर्गणीतून उपक्रम राबविले अध्यात्मावर त्यांची अपार श्रद्धा होती त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून 38 वर्षे सेवा केली त्यांना शासनाचा जिल्हा परिषद व राज्यस्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुलगे मुलगी नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बँकेच्या माजगाव शाखेचे व्यवस्थापक सुनील सावंत सुभेदार मेजर नित्यानंद सावंत यांचे ते वडील होत. 5 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता तळवडे येथे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.