भाजपच्या दाव्यानंतर आरोप-प्रत्यारोप
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर जारी केल्यानंतर वाद निर्माण झाला. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. हा भाजपचा कट असून आणि भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱयांना सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. शिवराजसिंह चौहान यांच्याबरोबरच भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मध्यप्रदेशमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा शुक्रवारी तिसरा दिवस आहे. ही यात्रा सध्या खरगोन जिह्यातून जात आहे. या प्रवासामध्ये प्रियंका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक ज्ये÷ नेत्यांचा समावेश आहे. ही भारत जोडो यात्रा आता देशाच्या मध्यवर्ती भागात पोहोचल्यानंतर तिला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच वेगवेगळय़ा वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाल्यामुळे काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धाचे प्रसंग उद्भवत आहेत.
घोषणाबाजी करणाऱयांवर कारवाई होणार
भारत जोडो यात्रेतील व्हिडिओवरून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी संताप व्यक्त केला. भारत जोडो यात्रेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा भारताला एक करण्यासाठी की भारत तोडणाऱयांना एकत्र करण्यासाठी देण्यात आल्या? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही भारत तुटला होता, पुन्हा भारत तोडण्याचा विचार आहे का? अशी विचारणा करत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा देणारे कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर या निंदनीय कृत्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा म्हणाले.
यात्रेतील प्रतिसादामुळे भाजप हैराण ः जयराम रमेश भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भाजपचा रोष वाढल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. भारत जोडो यात्रेला मिळालेले प्रचंड जनसमर्थन पाहून संतापाच्या भरात भाजपने यात्रेची बदनामी करण्यासाठी भडकाऊ व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. भाजपच्या अशा घृणास्पद डावपेचांचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे