सावंतवाडी / प्रतिनिधी
Degve-Mirekhanwadi, Moizerwadi road approved under Rural Development Plan; Villagers are satisfied..!
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-मिरेखणवाडी रस्ता हा ग्रामीण विकास योजनेतून सन् २०२२-२३ या वित्तीय वर्षांत मंजूर झाला असून सदर रस्त्याच्या कामाकरिता रुपये १० लक्ष मंजूर केले असल्याचे पत्र सावंतवाडी तालुक्याचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांनी तसे पत्र सरपंच,ग्रामपंचायत डेगवे यांना पत्र पाठविले आहे.याबाबत डेगवे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विजय देसाई यांनी कळविले असून मा.मंत्री महोदय दिपकभाई केसरकर यांचे आभार डेगवे ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने मानले आहेत. दरम्यान डेगवे मोयझरवाडी होळीचा खुंट ते तांबोळी रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी सहा लाख रुपये मंजूर झाले आहे दर्शन स्पष्ट केले आहे