वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली आयआयटीचा विद्यार्थी कलश गुप्ता टीसीएस कोड व्हिटा सिझन-10 चा विजेता ठरला आहे. त्यामुळे त्याची गणना जगातील टॉप कोडर अशी करण्यात येत आहे. या स्पर्धेत जगभरातील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कलश गुप्ता हे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग या शाखेचे विद्यार्थी आहेत. कोड व्हिटा ही जगातील सर्वात मोठी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविणे प्रति÷sचे मानले जाते.
पहिल्या क्रमांकाची आपल्याला अपेक्षा नव्हती, असे गुप्ता यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ही अत्यंत कठीण स्पर्धा असते. यासाठी सखोल ज्ञान आणि चाणाक्षपणा यांची आवश्यकता असते. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक 7 हजार डॉलर्स तर दुसऱया क्रमांकाचे पारितोषिक 3 हजार डॉलर्सचे आहे.
पहिल्या चार विजेत्यांना टीसीएस रिसर्च अँड इनोव्हेशन ग्रुपमध्ये इंटर्नशीप करण्याची ऑफर देण्यात येते. टीसीएसद्वारे दरवषी कोडिंग संबंधातील स्पर्धा भरविण्यात येतात, अशी माहिती देण्यात आली.