बाजारातील बुक डेपोंमध्ये धनत्रयोदशीपासून वहय़ा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱया दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. दिवाळीसाठी विविध वस्तुंची मागणी वाढली आहे. दिवाळीत व्यापाऱयांसाठी आवश्यक असलेल्या खातेकीर्द वहय़ांना मागणी वाढत आहे. बाजारातील बुक डेपोंमध्ये धनत्रयोदशीपासून वहय़ांसाठी गर्दी होऊ लागली आहे.
शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, किर्लोस्कर रोड आदी ठिकाणी असलेल्या बुकडेपोमध्ये व्यापारी पारंपरिक व्यवहारासाठी वहय़ांची खरेदी करत आहेत. दिवाळीच्या काळात व्यापाऱयांकडून रोज कीर्द रजिस्टर, व्यापारी वहय़ा, खातेकीर्द वहय़ा, विविध वर्गणी रजिस्टर, कॅशबुक, संस्थांचे रजिस्टर, बचत गट, दूध संस्था आदी वहय़ांच्या खरेदीसाठी बुकडेपोंमध्ये वर्दळ वाढली आहे. किराणा दुकानदार आणि इतर मोठे व्यापारी वर्षभराच्या व्यवहारासाठी खातेकीर्द आणि इतर वहय़ा खरेदी करतात. विशेषतः दिवाळीतच या वहय़ा खरेदी केल्या जातात. त्यामुळे वहय़ांना मागणी वाढली आहे.
बाजारात बुकडेपोंमध्ये खातेकीर्द वही 330 रुपये, रोजमेळ 960 रुपये, लक्ष्मी नोटबुक 90 रुपये यासह इतर रजिस्टर आणि वहय़ांच्या किमती आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे बाजारपेठेवर संकट आले होते. मात्र, यंदा बाजारपेठ सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे विविध व्यवहारांच्या वहय़ा खरेदीला उत्साह दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे गतवषीच्या तुलनेत यंदा वहय़ांच्या दरामध्ये 10 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱयांना वहय़ा खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
शनिवारपासून वहय़ा खरेदी
सोमवारी नरकचतुर्दशी व लक्ष्मी पूजन आहे. दरम्यान, लक्ष्मी पूजनावेळी व्यापाऱयांकडून खातेकीर्द आणि इतर वहय़ांचे पूजन केले जाते. त्यामुळे शनिवारपासून वहय़ा खरेदीला मागणी वाढली आहे. संपूर्ण वर्षभराचा हिशेब या वहय़ांमध्ये नोंद केला जातो. त्यामुळे व्यापारी, दूध संस्था आणि इतर संस्थांकडूनदेखील या वहय़ा खरेदी केल्या जात आहेत. बाजारात बेळगावबरोबर चंदगड, खानापूर आणि गोव्यातील व्यापाऱयांकडून यासाठी मागणी वाढली होती. याबरोबरच ग्रामीण भागातील किराणा दुकानदार, दूध संस्थांनीही पारंपरिक पद्धतीने खातेकीर्द वहय़ा खरेदी केल्या.
दिवाळी काळात खरेदी अधिक
ग्रामीण भागात किराणा दुकान आणि दूध डेअऱयांची संख्या अधिक आहे. दरम्यान, वर्षभराच्या हिशेबाच्या नोंदी ठेवण्यासाठी खातेकीर्द वहय़ा खरेदी केल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या काळात वहय़ांना मागणी असते. बाजारात व्यापाऱयांबरोबर ग्रामीण भागातील किराणा व्यापारी, दूध संस्था आणि इतर संस्थांचे पदाधिकारी वहय़ा खरेदी करताना दिसत आहेत.
वहय़ांना दिवाळीत उत्तम प्रतिसाद
व्यापाऱयांसाठी खातेकीर्द, रोजमेळ, लक्ष्मी नोटबुक यासह इतर वहय़ा उपलब्ध आहेत. गतवषीच्या तुलनेत यंदा वहय़ांच्या दरात वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून व्यापारी व विविध संस्थांच्या पदाधिकाऱयांकडून वहय़ांची मागणी वाढली आहे. या वहय़ांना दिवाळीच्या काळात उत्तम प्रतिसाद मिळतो.
– आशिष सावंत(रामतत्त्व बुक डेपो)