प्रतिनिधी /म्हापसा
उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा येथे भरविण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनास येथील हनुमान नाटय़गृहाच्या सभागृहात भेट देऊन पाहणी केली. तेसच पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व मोदीजींच्या जीवनाच्या प्रवासाची माहिती देशभरातील लोकांनी घेऊन त्यांची स्फूर्ती घ्यावी असे ते म्हणाले.
यावेळी आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले की, भाजपा व म्हापसा मंडळाच्या वतीने हे मोदींवर प्रदर्शन आयोजित केले आहे. पंतप्रधान मोदींजींचा 17 तारखेला वाढदिवस झाला. म्हापशात हा एक कार्यक्रम आहे. शनिवारी खोर्लीत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल. सायंकाळी बोडगेश्वर सभागृहात कार्यक्रम आहे. दरवर्षी पक्ष वेगवेगळे कार्यक्रम देतात. आम्ही म्हापशात 15 टीबी रुग्ण दत्तक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.