बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने संपूर्ण फाल्गुन महिन्यात धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येत आहे. फाल्गुन अमावास्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देऊन बलिदान मासची सांगता होते. या चितेला अग्नी देण्यासाठी वढू बुद्रुक येथून प्रज्वलीत केलेली ज्वाला बेळगावमध्ये आणण्यात आली असून आता ती गावागावात पाठविण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील शेकडो धारकरी छत्रपती शिवाजी उद्यान येथे एकत्रित आले होते. प्रज्वलित केलेली ज्वाला गावी घेऊन जाण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी धारकऱ्यांना बलिदान मास, धर्मवीर ज्वाला तसेच धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त होणारी मूक पदयात्रा याविषयी मार्गदर्शन केले. बेळगाव विभागातील 105 हून अधिक गावांमध्ये ज्वाला पोहोचविली गेली. बेळगावसह चंदगड, गोकाक, रायबाग, दोडामार्ग, सिंधुदुर्ग व गोवा येथेही ज्वाला वितरित करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख कल्लाप्पा पाटील, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, प्रवीण मुरारी, मोहन जुई, संदीप पाटील यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
Previous Articleवयोवृद्ध-दिव्यांग पेन्शनधारक अडचणीत
Next Article शहरात वृक्षांची विनापरवाना कत्तल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.