15 ऑगस्ट रोजी यांचे सादरीकरणाचे संकेत ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधारणपणे देशातील 75 जिल्हय़ांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट (डीबीयू)चे उद्घाटन करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सदर बँकेचे सादरीकरण हे 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
हे एक युनिट राहणार असून यांच्या अंतर्गत होणारी कामे ही पेपरलेस होणार आहेत. आज आपण डिजिटल बँकिंग युनिट म्हणजे काय? याचा वापर कसा करता येईल यासह अन्य प्रश्नांची उकल समजून घेणार आहोत.
काय असते डिजिटल बँकिंग युनिट?
कमर्शिअल बँक जी पहिल्यापासूनच डिजिटल बँकेंग करत आहे, आता डिजिटल बँक युनिटमध्ये चालू शकते. म्हणजे युनिट्समध्ये ग्राहकांसाठी ही सेवा पूर्णपणे डिजिटल राहणार असल्याची माहिती आहे. यालाच डीबीयु असे म्हणतात.
…यामध्ये काय काय करता येईल?
सदर युनिट सर्वसाधारण बँकेप्रमाणे बँक शाखांपेक्षा वेगळय़ा राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार कमीत कमी बचत आणि चालू खाते, मुदत बंद ठेव व रिकरिंग डिपॉझिट, मेट्रो आणि ट्रांझिट कार्ड, इंटरनेट बँकींग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, कर्ज, भीम क्यूआरकोड यासारख्या सेवा प्राप्त होणार आहेत. तसेच सर्व बाबीसाठी नेट बँकींग करण्याची सेवा मिळणार आहे. मात्र रोख स्वरुपात कोणताही व्यवहार करण्यात येणार नाही.
ग्राहकांसाठी फायदेशीर बाबी
डिजिटल बँकींगचा लाभ आतापर्यंत जवळपास 20 कोटी भारतीयांपर्यंत पोहोचला आहे. डीबीयूमधून डिजिटल बँकींग सेवांचा फायदा घेता येणार आहे. यामुळे याचा लाभ अर्थव्यवस्थेलाही होणार आहे.