ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटमध्ये मोठा बदल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचा बायो बदलला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याबद्दल माहिती देताना “Dis’Qualified MP” (अपात्र खासदार) असा उल्लेख केला आहे. राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटमधील हा बदल सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? असे वक्तव्य राहुल गांधीनी प्रचारादरम्यान केलं होतं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या 27 मिनिटांनी त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदतही दिली. मात्र, या जामिनाला 24 तास पूर्ण होत नाहीत, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
अधिक वाचा : मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी