तातडीने मराठी भाषिक अधिकाऱयांची सीआरपी म्हणून नेमणूक करा : युवा म. ए. समितीचे जिल्हाशिक्षणाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील मराठी शाळांवर कन्नड सीआरपी नेमणूक करून मराठी भाषिक शिक्षकांवर अन्याय केला जात आहे. तातडीने त्याठिकाणी मराठी भाषिक सीआरपींची नेमणूक करावी, या मागणीसाठी युवा म. ए. समितीच्यावतीने जिल्हाशिक्षणाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
मराठी भाषिक शिक्षकांवर कन्नडसक्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव जिल्हय़ातील सीआरपी कौन्सिलिंगवेळी जाणीवपूर्वक मराठी शाळांवर कन्नड सीआरपी अधिकाऱयांची नेमणूक केली जात आहे. बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर या दोन्ही तालुक्मयांमध्ये मराठी शाळांवर अन्यायकारकरित्या कन्नड सीआरपी नेमणूक केली जात आहे. मराठी भाषिक शिक्षकांना कन्नड अधिकाऱयांनी जाणूनबुजून कन्नड भाषेतील काम देणे, त्यांना नाहक त्रास देणे, असे प्रकार सुरू केले आहेत. ते थांबवावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली.
मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक देणे बंद करा
भारतीय घटनेनुसार भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक शाळांसाठी सर्व सोयी-सुविधा आणि त्यांचे भाषिक अधिकार देणे बंधनकारक आहे. असे असताना कन्नड भाषेची सक्ती करणे घटनाबाहय़ आहे. मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक देणे बंद करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
ज्या ठिकाणी कन्नड सीआरपी अधिकाऱयांची नेमणूक केली आहे, त्याठिकाणी मराठी भाषिक सीआरपींची तातडीने नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रमेश माळवी, किरण मोदगेकर, वासू सामजी, मनोहर हुंदरे, संतोष कृष्णाचे, बाबू पावशे, आशीर्वाद सावंत आदी उपस्थित होते.