आजच्या धावपळीच्या जगात वेळेवर न जेवणे, झोपणे किंवा फास्ट फूडमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. चेहऱ्यावरील काळ्या डांगामुळे सौंदर्य ही कमी होते. अशावेळी हे डाग घालवण्यासाठी अनेक जण ट्रीटमेंट देखील घेतात. पण यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. कधीकधी यामुळे डागांची समस्या वाढते. पण यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत जे डागांवर उपयुक्त ठरतात. ते कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊयात.
१. एका भांड्यात एक चमचा हळद पावडर घ्या. त्यात थोडे मध घाला. हळद आणि मधाची पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. अर्धा तास ही पेस्ट त्वचेवर अशीच ठेवा. यानंतर त्वचा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट वापरल्याने चेहऱ्यावर चमक येईल.
२. तुम्ही एलोवेरा जेल देखील वापरू शकता. यासाठी २ चमचे एलोवेरा जेलमध्ये मध मिसळा. १५ मिनिटे डागांवर लावा. यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
३. एका भांड्यात २ चमचे चंदन पावडर घ्या. त्यात ताज्या संत्र्याचा रस घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर काही मिनिटे ठेवल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा. यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. ही पेस्ट त्वचेला मॉइश्चरायझ करेल.
(वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)