न्यूयॉर्क : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार असल्याची घोषणा भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी केली आहे. निक्की हेली या पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. आमच्या देशाच्या शत्रूंना उत्तरदायी ठरविणारा, सीमा सुरक्षति करणारा आणि कुठलेही निमित्त पुढे न करणारा अध्यक्ष अमेरिकेला हवा आहे. जो बिडेन यांच्यापेक्षा ट्रम्प हे अधिक प्रभावी आहेत. याचमुळे मी ट्रम्प यांना मतदान करणार असल्याचे हेली यांनी म्हटले आहे.
Previous Articleअग्निपथ योजनेत बदल शक्य
Next Article इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यावर अंत्यसंस्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.