नेपाळचे तीन पर्यटक जखमी
Due to brake failure, the bus reverses directly into an adjacent field
नेपाळ येथील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचे उतारावर ब्रेक फेल झाल्यामुळे ती रिव्हर्स घेताना थेट लगतच्या शेतात कोसळली. बांदा दाणोली जिल्हा मार्गावर बावळाट – मुलांडावाडी येथे गुरूवारी रात्री १० च्या सुमारास झालेल्या या अपघातात तीन पर्यटक जखमी झाले.हे पर्यटक बसने गोवा येथून नेपाळ येथे परतत असताना हा अपघात घडला.
या अपघातात निशा खडका (वय २२) आणि निशा खडका (वय ३२) जखमी झाले असुन या पर्यटकांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित घाडी, हेड पोलिस कॉन्स्टेबल मयुर सावंत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व अन्य वाहनचालकांच्या मदतीने प्रवाशांना बसमधून बाहेर काढत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर प्रवाशांनी चालकाला जबाबदार धरल्यानंतर काही वेळाने बस चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
ओटवणे प्रतिनिधी