नागझर-कुर्टी येथील महादेव मंदिरातील गर्भकुडी शिरले पाणी : माशेल भागातील बहुतेक रस्ते जलमय
प्रतिनिधी /फोंडा
राज्यात संततधार सुरू असलेल्या पावस व वादळी वाऱयामुळे फोंडा तालुक्यातही पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली तसेच काहीठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली. खांडेपार नदीसह, बेतोडामार्गे वाहणारा ओहोळाची पाण्याची पातळी वाढून नागझर-कुर्टी येथील श्री महादेव मंदिरातील गर्बकुडीत पाणी शिरले. लिग्ंााचाही पावसाळी पाण्य़ाचा जलाभिषेक झाला. सोमवारी मंदाराला भेट दिलेल्या भाविकांनी गर्भकुडीत प्रवेशे करीत बेल-फुल वाहून जलाभिषेक केला.
काल सोमवारी झालेल्य़ा संततधार पावसात फोंडा अग्निशामक दलाने एकूण झाडे उन्मळून पडल्याची 7 तक्रारी नोंद केल्या. दिवसभर अग्निशामक दलाचे जवान रस्त्यावर कोसळलेली हटविण्यात व्यस्त होते. शापूर फोंडा येथील नवीन बसस्थानक येथे झाड कोसळून वाहतूक टप्प झाली. वाजे शिरोडा येथे मंडलेंश्वर देवस्थानजवळ रस्त्यावर झाड कोसळले. हवेली कुर्टी येथील बगलरस्त्यावर झाड कोसळले अग्निशामक दलाने तातडीने सहकार्य केले.
संततधार पावसामुळे माशेल परिसरातील रस्ते जलमय
मुसळधार पावसाने माशेल येथील सर्व रस्ते जलमय झाल्याने वाहतुकील बराच व्यक्तय आला. पावसाळय़ापुर्वी संबंधितांशी गटाराचा व्यवस्थित उपसा न केल्याने संपुर्ण पाणी रस्त्यावरू वाहत होते. काही ठिकाणी पाणी घरात व अस्थापनातही शिरले.
रस्त्याच्या मधोमध तसेच बाजूला खोदकाम केल्याने रस्त्यावरील पडलेल्या मोठय़ा खड्डय़ात पडून त्याना किरकोळ दुखापत झाल्या आहे. काही ठिकाणी रस्त्यावर माती आली आहे. एकंदरीत रस्त्यावर पाणी साचले आहे. एकंदरीत माशेल येथील सस्त्याची परिस्थिती बिकड झाली आहे. सुदैवाने झाडाची पडझड झाल्याची माहिती नाही.