लांजा : प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या सतर्क तिकीट तपासणी निरीक्षक टीम ने तुतारी एक्सप्रेस मध्ये विसरून गेलेली लाखो रुपये किमती ऐवज असलेली बॅग लांजातील प्रवाशाची परत करून प्रमाणिक पणाचे दर्शन घडवले आणि कोकण रेल्वेची प्रतिमा उंचावण्याचे कांम केले आहे.
आज दिनांक २० मार्च २०२३ रोजी दादर- सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस मध्ये duty करीत असताना स्लीपर कोच मध्ये एक सुटकेस आढळून आली तेव्हा तिकीट तपासनीस नंदु मुळ्ये यांनी सदर बॅगसंबंधी आजूबाजूच्या प्रवाशां जवळ चौकशी केली. परंतु कोणीही संपर्क केला नाही. तेव्हा त्यांनी कमर्शिअल कंट्रोलमध्ये कळविले तसेच बॅगेत मिळालेल्या आधार कार्ड वरून त्यांचा PNR क्रमांक मिळवला व विलवडे स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क केला असता त्या प्रवाशांनी तिथे चौकशी केली होती. लगेच त्या प्रवाशांनी मुळ्ये यांच्याशी संपर्क साधला व बॅग मधील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम १,००,०००/- सुरक्षित असल्याचे त्यांना सांगितले. RPF यांनी प्रवासी सौ.जाधव यांना फोन करून कळवून ओळख पटवून देऊन कणकवली येथे समक्ष भेटून बॅग नेण्यास सांगितले.