वृत्तसंस्था/ श्रीनगर
नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक आघाडी अंतर्गत लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गुपकार घोषणापत्र आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे दोन्ही पक्षांनी सांगितले आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही या आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत.
एका राजकीय पक्षाने गुपकार आघाडी सोडल्याचा दावा केला आहे, परंतु प्रत्यक्षात हा पक्ष कधीच आघाडीत सामील नव्हता असा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे. आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहोत. आम्हाला आमची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या लोकांनी अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरळीतपणे पार पाडावी याकरता प्रयत्न केले आहेत. पवित्र गुहेचा शोध घेणारा व्यक्ती पहलगाम येथील मुस्लीम रहिवासी होता असे विधान अब्दुल्ला यांनी केले आहे.