रेल्वे नेटवर्क सुरक्षेबाबत पार पाडली जबाबदारी
बेळगाव : रेल्वेकडून सुरक्षेबाबत अधिकाधिक लक्ष पुरविले जात आहे. काही वेळा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठे अपघात टळले जातात. अशा कर्मचाऱ्यांचा नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला. नैर्त्रुत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कॅसलरॉक येथील तंत्रज्ञ शंकर देऊळकर, संतोष गावडा, वास्को द गामा येथील रामा नाईक, नंदा बिहार, बी. के. चंद्रशेखर, मुकेश कुमार, नागराज एन., दर्शना राव, नवीनकुमार शर्मा, तारा आचारी, आर. रमेश, कुम्हेर सिंग, भालचंद्र रे•ाr, अनमोल शर्मा या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रेल्वे नेटवर्क सुरक्षेबाबत या कर्मचाऱ्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती.