वृत्तसंस्था /श्रीनगर
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे गुऊवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुप्तचर विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनंतर पोलीस आणि लष्कराकडून पथक पर्शियनपोरा पट्ट्यात शोधमोहीम राबवण्यात आली. एका संशयास्पद ठिकाणी तपास सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.