बॅटरीची अदलाबदल करण्याची सेवा लवकरच होणार सुरु
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमधील चार्जिंग संपल्यानंतर पुन्हा चार्जिंग करण्यावाचून पर्याय नसतो. पण आता यामध्ये बदल होणार असून बॅटरी स्वॅपिंगची योजना इलेक्ट्रिक वाहनांकरीता अस्तित्वात येत असून याअंतर्गत बॅटरीची अदलाबदल करण्याची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनधारकांना बॅटरी संपली असल्यास त्यांना दुसरी बॅटरी बदलून घेता येणार आहे.
महानगरांमध्ये होणार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स नीति आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ईव्ही वाहनांना लागणाऱया आगीमुळे वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून त्यावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात पहिल्या टप्प्यात 40 लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱया महानगरामध्ये बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे.