वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा क्रिकेट संघ डिसेंबर महिन्यात विंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात मर्यादित षटकांची मालिका खेळविली जाणार आहे. इंग्लंडच्या विंडीज दौऱ्याला 3 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा केली असून जोस बटलरकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. या दौऱ्यामध्ये वनडे आणि टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंड संघातील 6 खेळाडूंनी आपले या दौऱ्यासाठी स्थान राखले आहे. इंग्लंड संघामध्ये बटलर, रेहान अहमद, अॅटकिनसन, ब्रूक, कार्से, क्रॉले, सॅम करण, डकेट, हार्टेली, जॅक्स, लिव्हिंगस्टोन, ओली पॉप, सॉल्ट, टंग आणि टर्नर यांचा समावेश आहे.