ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे तारीवाडी येथील माजी सैनिक सोमा शिवा बांदेकर (८९) यांचे शनिवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय सैन्य दलात असताना त्यांनी भारतीय सिमारेषेवर तसेच नजीकच्या राज्यात त्यांनी सेवा बजावली. शनिवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, पाच मुली, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. येथील प्रसाद बांदेकर आणि कृष्णा बांदेकर यांचे ते वडील होत.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg