प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे आरपीडी कॉलेजच्या सभागृहात स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे ‘चित्रगाथा स्वातंत्र्याची’ प्रदर्शन सोमवार दि. 1 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आले आहे. आरपीडी कॉलेजच्या लायब्ररी हॉलमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
या प्रदर्शनात 385 छायाचित्रे असून ब्रिटिश सरकारच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध लढा दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे अकोला जिल्हय़ातील जयंत सहस्त्रबुद्धे यांनी संग्रहित केली आहेत.