मुंबई
भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेलच्या व्यवस्थापकीय संचालकपदासाठी गोपाल विठ्ठल यांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोपाल यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली असून पुढील 5 वर्षे तेच व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळणार आहेत. यावेळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत त्यांच्या बाजूने 97 टक्के सदस्यांनी मतदान केले. 1 फेब्रुवारी 2023 पासून त्यांचा नवा कार्यकाळ सुरू होणार आहे.