बेळगाव : शिवशक्तीनगर, अनगोळ येथील सिद्धिविनायक मंदिराशेजारी तुंबलेल्या गटारीसंबंधीचे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकिंग मशीनच्या साहाय्याने गटार साफ करण्याचा प्रयत्न केला. पण ती साफ होऊ शकली नाही. कदाचित गटारीत सिमेंट पडून ते त्या ठिकाणीच घट्ट झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सीडीच्या आत अडकलेली घाण काढण्यात अपयश आले. परिणामी, स्वच्छतेचे काम अर्धवट सोडून देण्यात आले. यावेळी नगरसेविका खुर्शीदा मुल्ला, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर व महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleकाही भागात किडीचा प्रादुर्भाव
Next Article टीचर्स कॉलनी येथील ‘त्या’ तलावाची सफाई करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.