25 टक्के गॅझेट्स, बाजारपेठेतील झगमगाट आजारास कारणीभूत, चीनमध्ये 90 हजार लोक मधूमेहग्रस्त
सणासुदीच्या काळात प्रकाशव्यवस्थेने उजळून गेलेले शहर किंवा बाजारातील डोळे दीपवून टाकणाऱया लाइट्स पहायला चांगल्या वाटत असल्या तरीही त्या मधूमेहास कारणीभूत ठरू शकतात. सर्वप्रकारच्या आर्टिफिशियल लाइट्स, मोबाइल-लॅपटॉप यासारखे गॅझेट्स, शोरुम्स बाहेर लावण्यात आलेली एलईडी, कारची हेडलाइट किंवा होर्डिंग्सवरील आकर्षित करणारी प्रकाशव्यवस्था देखील मधूमेहाचे शिकार करण्यास कारणीभूत ठरू शकते.
आर्टिफिशियल लाइटमुळे 25 टक्के शक्यता
चीनमध्ये 1 लाख लोकांवर झालेल्या संशोधनात स्ट्रीट लाइट आणि स्मार्टफोन यासारख्या आर्टिफिशियल लाइट्स मधुमेहाची शक्यता 25 टक्क्यांनी वाढवत असल्याचे दिसून आले आहे. रात्रीत देखील दिवसाची जाणीव करवून देणारा हा प्रकार मानवी शरीराच्या क्लॉकला बदलू लागतो, यामुळे शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रित करण्याची क्षमता कमी होत जाते. शांघाच्या रुईजीन रुग्णालयाचे डॉक्टर युजू यांनी जगातील 80 टक्के लोकसंख्या रात्रीच्या काळोखातील लाइट पॉल्युशनच्या सापळय़ात सापडली असल्याचे म्हटले आहे.
मधमेहाचे वाढले रुग्ण
गरजेपेक्षा अधिक प्रकाशच लाइट पॉल्युशन आहे. केवळ चीनमध्येच 90 लाख लोक लाइट पॉल्युशनमुळे मधुमेहाने ग्रस्त झाले आहेत. हे लोक चीनच्या 162 शहरांमध्ये राहतात. चीनच्या नॉन कम्युनिकेबल डिसिज सर्व्हिलान्स स्टडीत या रुग्णांची ओळख पटली होती. या अध्ययनात या रुग्णांच्या पूर्ण लाइफस्टाइलचा तपशील नमूद आहे. त्यांचे उत्पन्न, शिक्षण तसेच कौटुंबिक इतिहास देखील यात सामील आहे. जे लोक काळोखात सातत्याने दीर्घकाळापर्यंत कृत्रिम प्रकाशात राहिले, अशा लोकांपैकी 28 टक्के जणांमध्ये अन्नपचनाची व्यवस्था बिघडली होती, कारण प्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती कमी झाली होती. हा हार्मोन आमच्या मेटाबॉलिक सिस्टीमला योग्य राखत असतो.
प्रकाशामुळे ग्लुकोज पातळीत वाढ
जे लोक सदैव कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहतात, त्यांच्या शरीराची ग्लुकोज पातळी काही न खाता देखील वाढू लागते. यामुळे शरीरात बीटा सेल्सची सक्रीयता कमी होते. या सेल्सच्या सक्रियेतेमुळेच पॅन्क्रियाजद्वारे इन्सुलिन हार्मोन रिलिज होत असतात. कृत्रिम प्रकाशाचा कमाल संपर्क सर्व जगाच्या आधुनिक समाजाची समस्या आहे आणि मधुमेह होण्याचे हे आणखी एक मोठे कारण असल्याचे डॉ. जू यांचे म्हणणे आहे.
किटक-कीडय़ांचा अकाली मृत्यू
अमेरिका आणि युरोपचे 99 टक्के लोक लाइट पॉल्युशनमध्ये जगत आहेत. पृथ्वीचा 24 तासांचा दिवस-रात्रीचा क्लॉक असतो. हा सूर्यप्रकाश अन् काळोखामुळे निर्धारित होता. हे या ग्रहावर राहणाऱया प्रत्येक जीवावर लागू होते, परंतु माणसांनी यात फेरफार केला आहे. लाइट पॉल्युशनमुळे कीडे-किट, पक्षी आणि अनेक प्राण्यांचे जीवनचक्रच बदले आहे. या प्राण्यांचा अकाली मृत्यू होति असून यामुळे जगभरात जैवविविधेतेचे मोठे नुकसान होत आहे.