महिलेला आहे अजब आजार
जगात अनेक प्रकारचे लोक आहेत, यातील काही तर अजब प्रकारच्या शारीरिक स्थितीला तोंड देत आहेत. काही आजारांवरील उपचार सहजपणे उपलब्ध होतो. तर काही डिसऑर्डर हे सामान्य नसतात. ब्रिटनच्या नॉटिंगहॅममध्ये राहणाऱया व्हिक्टोरियाला एक अशा प्रकारचा फोबिया आहे, जो तिला स्वतःच्या हातांची भीती घालत आहे.
41 वर्षीय व्हिक्टोरियाला वेगळय़ा प्रकारचा फोबिया आहे. यामुळे ती स्वतःच्या हातांचे मनगट देखील पाहू शकत नाही. जर कुणी हाताला स्पर्श केला तर ते तिला आवडत नाही. लहानपणापासूनच तिला हा अजब आजार आहे. यामुळे ती स्वतःच्या मनगटांमध्ये पाहू शकत नव्हती.
लहानपणी व्हिक्टोरिया कुठल्याही अशाप्रकारच्या खेळात सामील होत नव्हती, ज्यात हात पकडला जाण्याची शक्यता होती. ती स्वतःच्या हाताला कपडय़ांनी झाकून ठेवायची. मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून काम करणाऱया व्हिक्टोरियाला 4 वर्षे वय असताना मनगटाला ईजा झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर घातल्या जाणाऱया टाक्यांवरून ती घाबरली होती. अशा स्थितीत ती स्वतःचे लक्ष विचलित करण्यासाठी ड्रेसिंगवेळी दुसरीकडे पाहू लागायची. तेव्हापासून सुरू झालेली ही समस्या कालौघात फोबियात रुपांतरित झाली आहे. ती आता स्वतःच्या मनगटांकडे पाहू शकत नाही.
हाताला स्पर्श करू देत नाही
व्हिक्टोरियाला एक मुलगी आहे. ही मुलगी हाताला स्पर्श न करू देण्याच्या बदल्यात स्वतःच्या पसंतीच्या गोष्टी करण्याची अनुमती मिळवते. तर जोडीदारालाही ती स्वतःच्या हातांना स्पर्श करू देत नाही. व्हिक्टोरिया सध्या तज्ञांद्वारे हिप्नोथेरेपी घेत आहे. तज्ञ दीप्ति व्हिक्टोरियाला सेशनद्वारे रिलॅक्श करण्याचा प्रयत्न करत आहे.