सावंतवाडी : प्रतिनिधी
न्यायालयाच्या परिसरात ई फायलिंग सेंटर सुरू होतेय, याचा अधिकाधिक लाभ घेऊन दावे ई फायलिंग द्वारे दाखल करा असे आवाहन सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी.बी सुतार यांनी केले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती आर.जे कुंभार उपस्थित होत्या. सावंतवाडी न्यायालयात महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल व एआयआर यांच्या माध्यमातून ती ई- फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे फीत कापून उद्घाटन शुक्रवारी दिवाणी न्यायाधीश श्रीम. सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुका बार असोसिएशनचे सर्व वकील उपस्थित होते .