तीन मजल्यांना आगीचा विळखा : अग्निशमन दलासोबतच लष्कराचीही मदत
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील वल्लभ भवन राज्य सचिवालयात शनिवारी भीषण आग लागल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. सचिवालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग आणखी दोन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, संपूर्ण घटनेवर देखरेख ठेवण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहे. वल्लभ भवन हे राज्य सरकारचे सर्वात मोठे कार्यालय आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची कार्यालये येथे आहेत. येथील वल्लभ भवनात सरकारी खात्यांची अनेक कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र आग इतक्मया वेगाने पसरत होती की अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. आगीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे पाहून प्रशासनाने भारतीय लष्कराची मदत मागितली. यानंतर लष्कराच्या जवानांनी आपल्या अग्निशमन वाहनांसह वल्लभ भवन गाठून आग विझवण्यास सुऊवात केली. अग्निशमन दलाच्या मदतीने दुपारपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. आग विझवण्यासाठी शहरातील अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.