दिल्लीमध्ये पाचव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. वाढती थंडी आणि धुक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी याबाबत माहिती दिली.
दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयाने शनिवारी असं घोषित केलं होतं, की शाळांच्या हिवाळी सुट्ट्या 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मात्र या आदेशात त्रुटी असल्याचं सांगत शनिवारी रात्री हा आदेश मागे घेण्यात आला होता. त्यानंतर आता सोमवारी शाळा सुरू होणार अशी चिन्हं दिसत होती.आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार आता सोमवारपासून केवळ सहावीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गांना आणखी पाच दिवस सुट्टी असणार आहे.