व्हिडिओने जिंकली युजर्सची मने
प्राण्यांमध्ये मौखिक स्वरुपात स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता नसते. परंतु ते स्वतःच्या कृतीद्वारे स्वतःचे म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवू शकतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडिओत एक श्वान एका व्यक्तीसोबत खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करताना दिसून येतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ‘खरी मैत्री काहीशी अशीच असते’ असे याच्या कॅप्शनमध्ये नमूद आहे. या प्रेमळ डिलिव्हरी बॉयचे नाव जॅक असून तो नेहमीच डिलिव्हरीसाठी या व्यक्तीसोबत जात असतो. व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती स्कुटीवर पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना त्याच्यासोबत श्वान असल्याचे व्हिडिओत दिसून येते.
संबंधित व्यक्ती डिलिव्हरी करताना हा श्वान त्याच ठिकाणी शांतपणे उभा राहत असल्याचे आणि डिलिव्हरी बॉय जाण्यासाठी तयार झाल्यावर श्वान स्कुटीवर त्याच्यासमोर बसत असल्याचे दिसून येते. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1.3 दशलक्षांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. याचबरोबर या व्हिडिओला 1.64 लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. डिलिव्हरी बॉय आणि श्वान यांच्यातील या नात्याबद्दल युजर्सनी कौतुकाची टिप्पणी केली आहे.