10 हेक्टर क्षेत्रात होणार वनझाडांच्या बियाणांची पेरणी
प्रतिनिधी /बेळगाव
पर्यावरण संवर्धनासाठी यंदा वनखात्याने रविवारपासून वनबीज पेरणी उत्सवाला प्रारंभ केला आहे. या अंतर्गत शहर आणि ग्रामीण भागातील 10 हेक्टर परिसरात 5 हजार वनझाडांच्या बियाणांची पेरणी केली जाणार आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत साहजिकच भर पडणार आहे. दरवषी वनखात्यातर्फे एक थीम ठरविली जाते. यंदा खात्याने ‘बियाणे पेरू वन वाढवू’ ही थीम ठेवली आहे. या अंतर्गत विविध भागात वृक्षलागवड केली जाणार
आहे.
विकासाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. याकरिता विविध सामाजिक संस्था आणि वनखात्याकडून दरवषी मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवडीचे काम हाती घेतले जात आहे. शिवाय जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रजातींची लागवड केली जात आहे. यामध्ये शेवगा, पळस, कापूस, वड, फणस आदी जातींचा समावेश आहे.
विविध संघटनांचे सहकार्य
वनविभागामार्फत 5 ते 12 जूनदरम्यान होणाऱया वनबीज पेरणी उत्सवात विविध जातीच्या वनवृक्षांच्या बियाणांची पेरणी केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी व विविध संघटनांचे सहकार्य मिळणार आहे. सरकारी जागा, खुल्या जागा, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी वृक्षलागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. याबरोबरच जिल्हय़ातील विविध वनक्षेत्रात ही मोहीम राबविली जाणार आहे.
पर्यावरण संवर्धनाबरोबर वनक्षेत्र वाढीसाठी वनखात्यामार्फत 5 ते 12 जून दरम्यान वनबीज पेरणी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या कालावधीत विविध बियाणांचा वापर करून रोपटी तयार केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी, स्वयंसेवक संस्थांनी व युवा संघटनांनी यामध्ये भाग घेण्यासाठी जवळच्या वनखात्याच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन वनखात्याने केले आहे.
सीडबॉलचादेखील समावेश
वनविभागातर्फे दरवषी हजारो रोपांची निर्मिती करून लागवड केली जाते. शिवाय पावसाळय़ाच्या तोंडावर बियाणांची लागवड केली जाते. यामध्ये सीडबॉलचादेखील समावेश आहे. यंदादेखील 5 जूनपासून हे काम हाती घेतले जाणार आहे. ज्यांना यामध्ये भाग घेऊन बियाणे लागवड करायची असल्यास वनखात्याशी संपर्क साधावा.