माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी बेळगावच्या जनतेशी संवाद साधला आणि जाहीर सभा घेतली. आज भारतीय जनता पार्टीच्या आयोजित संवाद कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी बूथ स्तरीय अध्यक्ष व कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. कर्नाटक राज्याला आदर्श बनविण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केल्याचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सांगितले.
बुधवारी धर्मनाथ भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस बुडणारे जहाज असून त्याला भविष्यकाळ नाही. त्यामुळे यंदा भाजप १३० ते १३५ सीट जिंकून सत्ता हासील करेल हे सत्य आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्याचा दौरा करीत आहेत. यावेळी मंत्री गोविंद कारजोळ , आमदार बसनगौडा यत्नाळ , खासदार मंगला अंगडी, विद्यमान आमदार अनिल बेनके, भाजप प्रवक्ते एम.बी.जिरली, मुरुगेंद्रगौडा पाटील, दादागौडा बिरादार आदी उपस्थित होते.