नोएडा
गुजरातचे माजी राज्यपाल ओ.पी. कोहली यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले आहे. निधनासमयी ते 87 वर्षांचे होते. मागील काही काळापासून कोहली हे आजारी होते आणि त्यांच्यावर नोएडा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. कोहली यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोहली यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष म्हणून काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोहली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.