Ratnagiri News : रत्नागिरी मधील माजी खासदार,ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. चंद्रकांत उर्फ बापूसाहेब परुळेकर (वय- 94) यांचे आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजता श्रीमान भागोजीशेठ किर अमरधाम,रत्नागिरी येथे अंत्यविधी होणार आहेत.
पूर्वी जनता पार्टीचे बापूसाहेब लोकसभेत दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते.अॅड. बापूसाहेब आणीबाणीच्या वेळी मिसाखाली 16 महिने तुरुंगात होते. रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे ते जिल्हा अध्यक्ष होते.रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते चेअरमन होते.त्यांच्या पश्चात वकील प्रदीप उर्फ बाबा परुळेकर यांच्यासह मुलगे,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.