प्रतिनिधी /पणजी
परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला सायबर गुन्हा विरेधी पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंद करून त्याला पोलीस कोठडीत रवाना करण्यात आले आहे. संशयिताचे बँक खाते जप्त करण्यात आले असून त्यात असलेले 1 लाख 50 हजार रुपयेही जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव इफेन्नी कॉलिन्स चिकव्यांडू (39 नायजेरियन) असे आहे. संशयित ऑनलाईनद्वारे युवकांना संपर्क करीत असे व त्यांना न्युझीलंड देशात नोकरी देण्याचे आमीश दाखवित होता. नोकरी पाहिजे असल्यास सोपस्कर पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये आपल्या खात्यात जमा करण्यास सांगत होता. दक्षिण गोव्यातील अनेकांनी परदेशात नोकरी मिळणार या आसेने संशय़िताच्या बँक खात्यार पैसे भरले होते. मात्र कित्येक दिस झाले तरी नोकरीचा पत्ता नव्हता त्यामुळे संशय़िताच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीचा तपास करून संशय़िताला अटक केली आहे.
सायबर गुन्हा विरोधी विभागाचे उपअधीक्षक शिवेंदू (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवेंद्र पिंगळे, उपनिरीक्षक सर्वेश सावंत, हवालदार योगेश खांडेपारकर, कॉन्स्टेबल संयोग शेटय़े, इब्राहिम करोल, व हेमंत गावकर यांनी बेंग्लोर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.